Bhondalyachi Gaani - Song Collections (भोंडल्याची गाणी)
ऐलमा पैलमा गणेश देवा (Ailama Pailama Ganesh Deva)
ऐलमा पैलमा गणेश देवा,माझा खेळ मांडू दे करीं तुझी सेवा
मांडला ग मांडला वेशीच्या दारी,
पारवळ घुमतं बुरजावरी
गुंजावनी डोळ्यांच्या सारवीन टिक्का,
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीनी गाव तेवीन गाव,
कांडा तिळूबाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दूध उंडे
उंडयाशी लागली टाळी,
आयुष्य दे रें ब्रम्हाळी
माळी गेला शेता भाता
पाउस पडला येता जाता
एड पड पावसा थेंबा थेंबी
थेंबा थेंबी आळ्या लोंबी
आळ्या या लोंबती अंखणा
अंखणा तुझी सात कणसं
हदग्या तुझी सोळा वर्षे
********************************
आज कोण वार बाई (Aaj Kon Vaar Bai)
आज कोण वार बाई आज कोण वारआज वार सोमवार महादेवाला नमस्कार || १||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार मंगलवार मंगळागौरीला नमस्कार || २ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार बुधवार बुधबृहस्पतीला नमस्कार || ३ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार गुरुवार दत्तला नमस्कार || ४ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शुक्रवार अंबाबाईला नमस्कार || ५ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शनिवार शनि-मारुतीला नमस्कार || ६ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार रविवार सूर्या नारायणाला नमस्कार || ७ ||
********************************
अक्कण माती चिक्कण माती (Akkan Mati Chikkan Mati)
अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावाअस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
********************************
शिवाजी आमुचा राणा (Shivaji Amucha Rana)
शिवाजी आमुचा राणा| त्याचा तो तोरणा किल्ला |किल्ल्यामध्ये सात विहिरी | विहिरीमध्ये सात कमळं |
एकेक कमळं तोडून नेलं | भवानी मातेस अर्पण केलं |
भवानी माता प्रसन्न झाली | शिवरायाला तलवार दिली |
तलवार घेउनी आला | हिंदूचा राजा तो झाला |
मोगलांचा फडशा तो केला | हिंदुनी त्याचे स्मरण करावे |
हादग्यापुढे गाणे गावे | प्रसन्न होईल गजगौरी |
प्रसाद वाटा घरोघरी |
********************************
नणंदा भावजया दोघी जणी (Nananda Bhavajaya Doghi Jani)
नणंदा भावजया दोघी जणी , घरात नव्हतं तिसरं कोणीशिंक्यावरचं लोणी खाल्ल कोणी , मी नाही खाल्लं वैनीनी खाल्ल
आता माझा दादा येईल गं, दादाच्या मांडीवर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी , असू दे माझी चोरटी
घे काठी , लाग पाठी , घरादाराची लक्ष्मी मोठी
********************************
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी (Sasurvashi Sun Rusun Basali Kaisi)
नणंदा भावजया दोघी जणी , खेळत होत्या छप्पापाणीखेळता खेळता झगडा झाला, भावजये वरी डाव आला
रुसून बसली गाईच्या गोठ्यात
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी घरासी येईना कैसी || धृ ||
सासू गेली समजावयाला, उठा उठा सुनबाई चला घराला
निम्मा संसार देते तुम्हांला, निम्मा संसार नको मजला
सासरा गेला समजावयाला, उठ उठ मुली चाल घराला
दौत लेखणी देतो तुजला, दौत लेखणी नको मजला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || 2 ||
जाऊ गेली समजावयाला, उठा उठा जाऊबाई चला घराला
ताकाचा डेरा देते तुम्हांला, ताकाचा डेरा नको मजला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ३ ||
दीर गेले समजावयाला , उठा उठा वाहिनी चला घराला
विट्टी दांडू देतो तुम्हांला, विट्टी दांडू नको आम्हाला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ४ ||
नणंद गेली समजावयाला, उठा उठा वाहिनी चला घराला
सोन्याची सुपली देते तुम्हांला , सोन्याची सुपली नको आम्हांला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ५ ||
पती गेले समजावयाला , उठा उठा राणीसाहेब चला घराला
लाल चाबूक देतो तुम्हांला , उठली गं उठली गजबजून
पदर घेतला सावरून, ओचा घेतला सावरून
कापत कापत आली घरासी
यादवराया राणी घरासी आली कैसी || ६ ||
********************************
एक लिंबू झेलू बाई (Ek Limbu Jhelu Bai)
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलूदोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाच लिंबांचा पाणवठा , माळ घाली हणमंताला
हणमंताला निळी घोडी, येता जात कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागं होती राणी
अगं, अगं राणी इथं कुठं पाणी, पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू, तेथें खेळे चिलारी बाळू
चिलारी बाळाला भूक लागली , सोन्याचे शिपल्याने दूध पाजले
परटाच्या घडीने तोंड पुसले
निज निज बाळा वेल्हाळा, आम्ही जातो वरच्या माळा
वरच्या माळा जाऊ या, सात खडे आणू या
एकेक खडा मोठा, गौराईच्या पोटा
गौराई तुझं ठाणं गं , आता कधी येणं गं
आता येणं चैत्र मासा , चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हारा
देव्हाऱ्याच्या चौकटी, उठता उठता बसता लाथा बुक्की
Comments
Post a Comment