Hil Hil Pori Hila - Song Lyrics

हिल हिल पोरी हिला - दादा कोंडके चित्रपट गीत
Dada Kondke Song Lyrics

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला
तुझ्या कप्पालीला टिला, ग फॅशन मराठी शोभेल तुला

आरं जा जा तू मुला, का सत्‍तावितंय मला,
का सत्‍तावितंय मला, न जाऊन सांगेन मी बापाला,

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला..

धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी,
आरं जेवण करायला, पाणी भरायला, ठेवीन घरकामाला,

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला..

तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी,
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला,

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला..

तुझा पदर वार्‍याशी उडतो, अग बघून जीव धडधडतो
तुझी नखर्‍याची चाल, करी जीवाचं हाल, माझे गुल्लाबाचे फुला.

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला..

Comments