चांदणे चाहूल होती कोवळ्या पाऊलि माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वयं अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय थबकले उंब-यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भारता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका !
Comments
Post a Comment