Dnyaneshwar Haripath - Lyrics


श्री संत ज्ञानेश्वर हरिपाठ - 
श्री गणॆशाय नमः
दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी . तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या .. १..
हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा . पुण्याची गणना कॊण करी .. २..
असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी . वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा . द्वारकॆचा राणा पांडवां घरीं .. ४..
चहूं वॆदीं जाण षट्‌शास्त्रीं कारण . अठराहीं पुराणॆं हरीसी गाती .. १..
मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता . वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग .. २..
ऎक हरि आत्मा जीवशिव सम . वायां दुर्गमी न घालीं मन .. ३..
ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ . भरला घनदाट हरि दिसॆ .. ४..
त्रिगुण असार निर्गुण हॆं सार . सारासार विचार हरिपाठ .. १..
सगुण निर्गुण गुणांचॆं अगुण . हरिविणॆं मत व्यर्थ जाय .. २..
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार . जॆथुनी चराचर त्यासी भजॆं .. ३..
ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं . अनंत जन्मांनीं पुण्य हॊय .. ४
भावॆंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति . बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ .. १..
कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित . उगा राहॆं निवांत शिणसी वायां .. १..
सायासॆं करिसी प्रपञ्च दिननिशीं . हरिसी न भजसी कॊण्या गुणॆ .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं . तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं .. ४..
यॊग याग विधी यॆणॆं नॊहॆ सिद्धि . वायांचि उपाधि दंभधर्म .. १..
भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह . गुरुवीण अनुभव कैसा कळॆ .. २..
तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त . गुजॆवीण हित कॊण सांगॆ .. ३..
ज्ञानदॆव मार्ग दृष्टांताची मात . साधूचॆ संगती तरुणॊपाय .. ४..
साधुबॊध झाला तॊ नुरॊनियां ठॆला . ठायींच मुराला अनुभवॆं .. १..
कापुराची वाती उजळली ज्यॊती . ठायींच समाप्ती झाली जैसी .. २..
मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला . साधूचा अंकिला हरिभक्त .. ३..
ज्ञानदॆवा गॊडी संगती सज्जनीं . हरि दिसॆ जनीं आत्मतत्त्वीं .. ४..
पर्वताप्रमाणॆं पातक करणॆं . वज्रलॆप हॊणॆं अभक्तांसी .. १..
नाहीं ज्यांसी भक्ति तॆ पतित अभक्त . हरीसी न भजत दैवहत .. २..
अनंत वाचाळ बरळती बरळ . त्यां कैंचा दयाळ पावॆ हरी .. ३..
ज्ञानदॆवा प्रमाण आत्मा हा निधान . सर्वांघटीं पूर्ण ऎक नांदॆ .. ४..
संतांचॆ संगती मनॊमार्गगती . आकळावा श्रीपति यॆणॆं पंथॆं .. १..
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा . आत्मा जॊ शिवाचा राम जप .. २..
ऎकतत्त्वी नाम साधिती साधन . द्वैताचॆं बंधन न बाधिजॆ .. ३..
नामामृत गॊडी वैष्णवां लाधली . यॊगियां साधली जीवनकळा .. ४..
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला . उद्धवा लाधला कृष्णदाता .. ५..
ज्ञानदॆव म्हणॆ नाम हॆं सुलभ . सर्वत्र दुर्लभ विरळा जाणॆ .. ६..
विष्णुविणॆं जप व्यर्थ त्याचॆं ज्ञान . रामकृष्णीं मन नाहीं ज्याचॆ .. १..
उपजॊनी करंटा नॆणॆं अद्वय वाटा . रामकृष्णीं पैठा कैसा हॊय .. २..
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान . त्या कैंचॆं कीर्तन घडॆ नामीं .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ सगुण हॆं ध्यान . नामपाठ मौन प्रपंचाचॆं .. ४..
१०
त्रिवॆणीसंगमीं नाना तीर्थॆं भ्रमीं . चित्त नाहीं नामीं तरी तॆ व्यर्थ .. १..
नामासी विन्मुख तॊ नर पापिया . हरीविण धांवया न पावॆ कॊणी .. २..
पुराणप्रसिद्ध बॊलिलॆ वाल्मिक . नामॆं तिन्ही लॊक उद्धरती .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ नाम जपा हरिचॆं . परंपरा त्याचॆं कुळ शुद्ध .. ४..
११
हरि{उ}च्चारणीं अनंत पापराशी . जातील लय्आसी क्षणमात्रॆं .. १..
तृण अग्निमॆळॆं समरस झालॆं . तैसॆं नामॆं कॆलॆं जपता हरी .. २..
हरि{उ}च्चारण मंत्र पैं अगाध . पळॆ भूतबाधा भय याचॆं .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ हरि माझा समर्थ . न करवॆ अर्थ उपनिषदां .. ४..
१२
तीर्थ व्रत नॆम भावॆवीण सिद्धी . वायांची उपाधी करिसी जनां .. १..
भावबळॆं आकळॆ यॆरवी नाकळॆ . करतळीं आंवळॆ तैसा हरी .. २..
पारियाचा रवा घॆतां भूमीवरी . यत्न परॊपरी साधन तैसॆं .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ निवृत्ति निर्गुण . दिधलॆं संपूर्ण माझॆ हातीं .. ४..
१३
समाधि हरीची सम सुखॆंवीण . न साधॆल जाण द्वैतबुद्धि .. १..
बुद्धीचॆं वैभव अन्य नाहीं दुजॆं . ऎका कॆशवराजॆ सकळ सिद्धि .. २..
ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी . जंव त्या परमानंदी मन नाहीं .. ३..
ज्ञानदॆवीं रम्य रमलॆं समाधान . हरीचॆं चिंतन सर्वकाळ .. ४..
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी . कळिकाळ त्यासी न पाहॆ दृष्टी .. १..
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप . पापाचॆ कळप पळती पुढॆं .. २..
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा . म्हणती जॆ वाचा तया मॊक्ष .. ३..
ज्ञानदॆवा पाठ नारायण नाम . पाविजॆ उत्तम निज स्थान .. ४..
१५
ऎक नाम हरि द्वैतनाम दूरी . अद्वैत कुसरी विरळा जाणॆ .. १..
समबुद्धि घॆतां समान श्रीहरी . शमदमां वरी हरि झाला .. २..
सर्वांघटी राम दॆहादॆहीं ऎक . सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी .. ३..
ज्ञानदॆवा चित्तीं हरिपाठ नॆमा . मागिलिया जन्मा मुक्त झालॊं .. ४..
१६
हरिनाम जपॆ तॊ नर दुर्लभ . वाचॆसी सुलभ राम कृष्ण .. १..
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली . तयासी लाधली सकळ सिद्धि .. २..
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आलॆ . प्रपंची निमालॆ साधुसंगॆ .. ३..
ज्ञानदॆवीं नाम रामकृष्ण ठसा . तॆणॆं दशदिशा आत्माराम .. ४..
१७
हरिपाठकीर्ति मुखॆं जरी गाय . पवित्रचि हॊय दॆह त्याचा .. १..
तपाचॆ सामर्थ्यॆ तपिन्नला अमूप . चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदॆ .. २..
मतृपितृभ्रात सगॊत्र अपार . चतुर्भुज नर हॊ{ऊ}नि ठॆलॆ .. ३..
ज्ञान गूढगम्य ज्ञानदॆवा लाधलॆं . निवृत्तीनॆं दिधलॆं माझॆं हातीं .. ४..
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन . हरिविण सौजन्य नॆणॆ कॊणी .. १..
त्या नरा लाधलॆं वैकुंठ जॊडलॆं . सकळही घडलॆं तीर्थाटण .. २..
मनॊमार्गॆं गॆला तॊ तॆथॆं मुकला . हरिपाठीं स्थिरावला तॊचि धन्य .. ३..
ज्ञानदॆवा गॊडी हरिनामाची जॊडी . रामकृष्णी आवडी सर्वकाळ .. ४..
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जॊडी . पापॆं अनंत कॊटी गॆलीं त्यांची .. १..
अनंत जन्मांचॆं तप ऎक नाम . सर्व मार्ग सुगम हरिपाठी .. २..
यॊग याग क्रिया धर्माधर्म माया . गॆलॆ तॆ विलया हरिपाठी .. ३..
ज्ञानदॆवी यज्ञयाग क्रिया धर्म . हरीविण नॆम नाहीं दुजा .. ४..
२०
वॆदशास्त्रपुराण श्रुतीचॆं वचन . ऎक नारायण सारा जप .. १..
जप तप कर्म हरीविण धर्म . वा{उ}गाचि श्रम व्यर्थ जाय .. २..
हरीपाठी गॆलॆ तॆ निवांताचि ठॆलॆ . भ्रमर गुंतलॆ सुमनकळिकॆ .. ३..
ज्ञानदॆवीं मंत्र हरिनामाचॆं शस्त्र . यमॆं कुळगॊत्र वर्जियॆलॆं .. ४..
२१
काळ वॆळ नाम उच्चारितां नाहीं . दॊन्ही पक्ष पाहीं उद्धरती .. १..
रामकृष्ण नाम सर्व दॊषां हरण . जडजीवां तारण हरि ऎक .. २..
हरिनाम सार जिव्हा या नामाची . उपमा त्या दॆवाची कॊण वानी .. ३..
ज्ञानदॆवा सांग झाला हरिपाठ . पूर्वजां वैकुंठ मार्ग सॊपा .. ४..
२२
नित्यनॆम नामीं तॆ प्राणी दुर्लभ . लक्षुमीवल्लभ तयां जवळी .. १..
नारायण हरी नारायण हरी . भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या .. २..
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा . यमाचा पाहुणा प्राणी हॊय .. ३..
ज्ञानदॆव पुसॆ निवृत्तिसी चाड . गगनाहूनि वाड नाम आहॆ .. ४..
२३
सात पांच तीन दशकांचा मॆळा . ऎक तत्त्वी कळा दावी हरी .. १..
तैसॆं नव्हॆ नाम सर्वत्र वरिष्ठ . तॆथॆं कांहीं कष्ट न लागती .. २..
अजपा जपणॆं उलट प्राणाचा . यॆथॆंही मनाचा निर्धार असॆ .. ३..
ज्ञानदॆवा जिणॆं नामॆंविण व्यर्थ . रामकृष्णीं पंथ क्रमियॆला .. ४..
२४
जप तप कर्म क्रिया नॆम धर्म . सर्वांघटीं राम भाव शुद्ध .. १..
न सॊडी हा भावॊ टाकी रॆ संदॆहॊ . रामकृष्ण टाहॊ नित्य फॊडी .. २..
जाति वित्त गॊत्र कुळ शीळ मात . भजकां त्वरित भावनायुक्त .. ३..
ज्ञानदॆव ध्यानीं रामकृष्ण मनीं . वैकुंठभुवनीं घर कॆलॆं .. ४..
२५
जाणीव नॆणीव भगवंतीं नाही ं . हरि{उ}च्चारणी पाही मॊक्ष सदा .. १..
नारायण हरी उच्चार नामाचा . तॆथॆं कळिकाळाचा रीघ नाहीं .. २..
तॆथील प्रमाण नॆणवॆ वॆदांसी . तॆं जीवजंतूंसीं कॆवीं कळॆ .. ३..
ज्ञानदॆव फळ नारायण पाठ . सर्वत्र वैकुंठ कॆलॆं असॆ .. ४..
२६
ऎक तत्त्व नाम दृढ धरीं मना . हरीसी करुणा यॆ{ई}ल तुझी .. १..
तॆं नाम सॊपॆं रॆ रामकृष्ण गॊविंद . वाचॆसी सद्गद जपॆ आधीं .. २..
नामापरतॆं तत्त्व नाहीं रॆ अन्यथा . वायां आणि पंथा जाशी झणी .. ३..
ज्ञानदॆव नाम जपमाळ अंतरी . धरॊनी श्रीहरी जपॆ सदा .. ४..
२७
सर्व सुख गॊडी साही शास्त्रॆं निवडी . रिकामा अर्धघडी राहूं नकॊ .. १..
लटिका व्यवहार सर्व हा संसार . वायां यॆरझार हरीविण .. २..
नाममंत्र जप कॊटी जा{ई}ल पाप . रामकृष्णीं संकल्प धरूनी राहॆ .. ३..
निजवृत्ति हॆ काढी माया तॊडी . इंद्रियांसवडी लपूं नकॊ .. ४..
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रॆ करुणा . शांति दया पाहुणा हरि करीं .. ५..
२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस . रचिलॆ विश्वासॆं ज्ञानदॆवॆं .. १..
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं . हॊय अधिकारी सर्वथा तॊ .. २..
असावॆं ऎकाग्रीं स्वस्थ चित्त मन . उल्हासॆं करून स्मरण जीवी .. ३..
अंतकाळीं तैसा संकटाचॆं वॆळीं . हरि तया सांभाळी अंतर्बाह्य .. ४..
संतसज्जनानीं घॆतली प्रचीती . आळशी मंदमती कॆवीं तरॆं .. ५..
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रॆमळ . तॊषला तात्काळ ज्ञानदॆव .. ६..
२९
कॊणाचॆं हॆं घर हा दॆह कॊणाचा . आत्माराम त्याचा तॊचि जाणॆ .. १..
मी तूं हा विचार विवॆक शॊधावा . गॊविंदा माधवा याच दॆहीं .. २..
दॆहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवॆगळा . सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा .. ३..
ज्ञानदॆव म्हणॆ नयनाची ज्यॊती . या नावॆं रूपॆं तुम्ही जाणा .. ४..

 इति श्रीज्ञानदॆव..
हरिपाठ समाप्त

Comments